कविता म्हणजे काय असते?
कविता म्हणजे विश्व असते,
आकाशातल्या ताऱ्यांची संख्या असते,
एखाद्या धूमकेतूची शेपटी असते.
कविता म्हणजे सूर्यमाला असते,
केंद्राभोवती फिरणाऱ्या ग्रहाची गती असते,
विशिष्ठ गुरुत्वात फिरण्याची कक्षा असते.
कविता म्हणजे 'पृथ्वी' असते,
सजीव-निर्जीवांची संचायानी असते,
स्वतः बरोबर सकलांना फिरवणारी असते.
कविता म्हणजे माणूस असते,
श्रमिकांचे श्रम असते.
प्रियकराचे प्रेम असते,
कविता म्हणजे काय असते?
'कविता' म्हणजे नुसती यमक-बंध नसते --
'क'सून 'वी'चारकेलेला 'ता'ळेबंद असते.
Comments