असंच
'असंच' काही नसतं
नक्कीच काहीतरी असतं
'काही नाही' म्हणण्यात सुद्धा
'काही तरी' नसणे हे असतं
म्हणून म्हणतो
असंच काही नसतं
नक्कीच काहीतरी असतं.
मला काही नको
असे म्हणण्यात 'काय काय नको' हे असतं
'काही हि नको' हे तात्पुरतं असतं
नंतर पुन्हा काहीतरी हवंच असतं
निदान 'काही हि ' नको ह्यातले
हे 'म्हणणे' तरी हवे असते.
म्हणूनच म्हणतो 'असंच' काही नसतं.
मी 'खरंच' सांगतोय
म्हणण्यात 'मी खरा आहे' हे असतं
'मीच खरा आहे' हे हि कधी कधी असतं
पण खरं काय नि खोटं काय?
हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं
चांगल्या वाईटाचं ज्ञान प्रत्येकाला असतं
म्हणून म्हणतो असाच काही नसतं
नक्कीच काहीतरी असतं......
Comments