Skip to main content

Posts

History must not Repeat Now...

 History Must Not Repeat Now….. (Older Post Repeated) So many titles like ‘Do or Die’, ‘Save India from Naxalites’, ‘China; a big threat’, ‘O India, please awake!’, and ‘The Dragon’s Danger’ suddenly broke into my mind as i started thinking of this write-up.  You will surely come to know why i purposefully selected this one as you read it out. Already obliterated by invaders and now being brutally bruised by her insiders, India, my mother India, looks with expectant eyes and pleads to her sparse virtuous sons to unite against the Dragon’s Danger.  It is high time now when the youth of this nation should pay a conscious heed to the clarion call of China-sieged-mother India.  It is an ancient truth that literally prevails in this age observed by great thinker of the soil, Aarya Chanakya, that every country has four kinds of threats; one outsider who shakes hands with the insider, one insider who shakes hands with the outsider, one outsider who shakes and with another outsider and one i
Recent posts
  Health and Fitness 28/2/2022         One might think 'Health' is a similar word to 'Fitness' as both are used with reference to the human body. The former is used for 'state of being' and the latter is 'ability of a human being'. Let's put some light on each of them.           According to WHO, " Health is a state of complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease."              Health also encompasses some more spheres like mental or psychological health and spiritual and social health. Many medicos relate all these combined to lower stress levels to improve health. In a nutshell, we can say a person with good health has a body functioning and performing in a better way.               To maintain better physical health one should practice effective hygiene, avoid addiction, follow a native medicine system like Ayurveda, use protective devices, and do regular exercises like Yoga and gym.             

चिकाटी

 चिकाटी आम्हाला सवय फक्त लॉक, लॉकअप, लॉकर आणि लिपलॉक एवढ्याची, एवढीच काय ती मजल होती आमच्या इवल्या मेंदूची. लिपलॉक हा लोकलज्जेस्तव कधी उच्चारला सुद्धा नाही. लॉकर वगैरे असायला तशी ऐपत नव्हती  कधी त्याचा संबंध आला नाही. नाही म्हणायला, इन्शुरन्स वाल्यांनी 'लॉकइन' रुजवला आहे खरा.  पण हिंदी सिनेमाने मात्र प्रामाणिकपणे  'लिपलॉक' हा हिन्दी शब्द(?) लहानपणापासून शिकवला आहे. त्यात आता हे 'लॉकडाऊन'! अन सगळंच झालंय अपसाईड डाऊन!! कुणाचं शेअर मार्केट डाऊन, कुणाचं टीआरपी डाऊन, कुणाचं इनकम डाऊन, कुणाचं डाऊन राजकारण, कुणाचं डाऊन आचरण कुठं रेड अलर्ट तर कुठं बॉटमस् रेड! हॉस्पिटल्सनी सज्ज ठेवले असंख्य बेड. सरकार सगळे उपाय करायला कंबर कसून तयार, विरोधकांनी त्याचं ही करावं हत्यार. एकशे तीस कोटींचा देश, त्यातही अव्यवस्था, अज्ञान, अशिक्षितपणा, बेकारी, दहशतवाद, श्रद्धाळू अंधश्रद्धा आणि डोळस अंधश्रद्धा किती किती म्हणून अडचणी? पण भारतीय बाण्याचा एक गुण विशेष : *चिकाटी* कुठल्याही समस्येवर मात करण्याची त्यांची जुगाडू हातोटी! असो, कुणी मेनू बनवले, कुणी खेळ खेळले (इंडोर) कुणी एकमेकांना घरबसल्
  अनुत्तरीत प्रश्नांचे ठोके .... व्यवहाराच्या खिडकीतून जगाकडे पाहताना निर्लज्जपणाचा चष्मा डोळ्यांना असं काही भावहीन दृष्य दाखवतोय की मेदुपर्यंत जाणारे तरंग संवेदना बनतच नाहीत. मग हृदय तरी कसं द्रवणार, नाही का? त्याचे ठोके अविरत जैवयांत्रिकतेने प्रेरित असल्याने न चुकता पडत राहतात. अन त्या सोबत पडतात अनेक अनुत्तरीत प्रश्न... पहाटेने सकाळला, मध्यान्नाने तीनिसंजेला, अन रात्रीने किरर्र काळोखाला विचारलेले... अनुत्तरीत प्रश्न! आपुलकीचा आव आणणारया गप्पांतून, माणुसकीचे मुखवटे चढवून त्या प्रश्नांना बेमालूमपणे बगल दिली जाते... स्मृतीचिन्हे, स्मरणिका , जाहीरनामे, सोहळे, समारंभ .... सगळं सगळं ते डोळे पाहतात पण अनुभवत नाहीत. नुसत्या लहरीच पोहोचवतात संवेदना नाही, जाणीव नाही फक्त अनुत्तरीत प्रश्नांचे ठोके निर्माण करतात....बस! ....अभिनव अक्षर

परिवर्तनाचा हुंकार...

 

साल सरता सरता...

साल सरता सरता संपून गेले, जीवनाचे मोल मृत्यूच्या विक्राळ रूपातून सादर करून. माणसाच्या हाती असलेल्या असहायतेच्या कटोऱ्यात, त्याच्या प्रतिभेची अन बुद्धीची कीव यावी इतक्या ठणाणणाऱ्या आवाजात एक निराशेचं नाणं टाकून, साल सरता सरता संपून गेलं! साल सरता सरता संपवून गेलं माणसाच्या सर्वव्यापी अहंकाराला,  त्याच्या निसर्ग विजयाच्या उन्मादाला,  त्याच्या विश्वविजयी हव्यासाला एका सूक्ष्मातिसूक्ष्म अन शुल्लक वाटणाऱ्या  पण विश्वव्यापी प्रहरानं नामोहरम करून गेलं. हो पण जाताना त्यांन ज्यांना ज्यांना नेलं  त्यात किंचितही भेदाभेद केला नाही,  संपूर्ण निःपक्षपाती व्यवहार बरं!   सिनेतारकांपासून क्रीडापटूपर्यंत, शास्त्रज्ञापासून शास्त्र शिकवणाऱ्या पर्यंत,  या टोकापासून त्या टोकापर्यंत, बातमी देणाऱ्यापासून ते प्रत्यक्ष बातमी बनणाऱ्यापर्यंत  त्यानं सर्वांना समान न्याय दिला खरा. या वर्षानं दाखवून दिलं माणसाला माणूस म्हणून त्याची काय किंमत आहे ते.  कष्टानं जगताना, प्रामाणिकपणे वागताना,  परिवर्तनाचं स्वागत करून स्वतःला परिवर्तित करायला शिकवलं.  कारण शेवटी परिवर्तन ही संसार का नियम हैं  आणि परिवर्तन हेच परिस्थिती पर

वाढदिवस

क्यालेंडर ची पाने उलटतात, पुन्हा तो दिनांक येतो.... कुणीतरी आपल्याला मध्यरात्री नंतर फोन करतं  आणि आपण मोठे होतो.... मोठे होतो म्हणजे नेमकं काय होतं? दुसर्याच्या नजरेचा कोण वाढतो  आपल्या वाढत्या उंचीबरोबर ... विचार वाढतात, आचार दृढ होतात... आपल्या 'आपल्या' माणसांच्या  आपलेपणाचे आभाळ आनंदाने ओथंबते.