क्यालेंडर ची पाने उलटतात,
पुन्हा तो दिनांक येतो....
कुणीतरी आपल्याला मध्यरात्री नंतर फोन करतं
आणि आपण मोठे होतो....
मोठे होतो म्हणजे नेमकं काय होतं?
दुसर्याच्या नजरेचा कोण वाढतो
आपल्या वाढत्या उंचीबरोबर ...
विचार वाढतात, आचार दृढ होतात...
आपल्या 'आपल्या' माणसांच्या
आपलेपणाचे आभाळ आनंदाने ओथंबते.
Comments