दीपावलीच्या पहाटवेळी...
दीपावलीच्या पहाटवेळी
पणत्यांनी प्रकाशपित्याचं स्वागत केलं.
फटाक्यांच्या गजरान
सारं गांव जागं झालं.
तेल-उटण्याच्या मार्दनानं
मग प्र्यत्येकानं अभ्यंग केलं.
रांगोळीच्या गालीच्यानी
आंगण सजवलं.
सुंदर-सुंदर वेशभूषेन
थोर-मोठ्यांसह लहानांना नटवल.
काकड आरतीच्या घंटांनी
नाद्ब्रःम्माला साकडं घातलं.
फराळाच्या मेजवानीन
खावैय्याचं पोट दुणावल
"शुभ दीपावली ! शुभ दीपावली !"
असं शेकहेंड करत आलिंगन देवून
प्रत्येकाला सांगितलं.
दीपावलीच्या पहाटवेळी
पणत्यांनी स्वागत असं
प्रकाशपित्याचं केलं.
.....इलेश.
Comments