पाउस आता जराजरा जोर धरतोय...
पाउस आता जराजरा जोर धरतोय,
वेडापिसा होऊन मुसळधार बरसतोय...
ओढाळ ओढ्याला खळाळून नाचावतोय
तोय-तोय, तोय-तोय सर्वत्र करतोय.
पाउस आता जराजरा जोर धरतोय,
तिच्या आठवांचा त्याला क्षणक्षण स्मरतोय...
स्पर्श-गंध-रूप-रंग संगही आठवतोय,
तोय-तोय आठवणी आसवांनी वाहतोय.
पाउस आता जराजरा जोर धरतोय
हिरव्यागार वेळी-फांद्या भारावून सोडतोय,
नाठाळ नदी भरून दुथडी सागरमय करतोय...
तोय-तोय चहूकडे संदिकोपरा भरतोय..
पाउस आता जराजरा जोर धरतोय
तीच्य अवखळ हास्याला गालखळी देतोय
आणि थेंब-पानी स्पर्श त्याचा तिचं अंगअंग शहरतोय
तोय-तोय डोळ्यांतून ओढ तिला लावतोय.
पाउस आता जराजरा जोर धरतोय
बरसतान हा ऋतू उगवण्याचे सांगतोय...
त्याच्या-तिच्या विरहात स्मरण-दुवा होतोय...
तोय-तोय आठवणी खोल-खोल रुजवतोय...
पाउस आता जराजरा जोर धरतोय
वेडापिसा धरणीसाठी मुसळधार बरसतोय.
Comments