काही माणसं हसतात वरवरून
नुसती स्मिताची पुटं चढवून.
मनसोक्त असं नसतंच काही
असतात नुसतं हातचं raakhun.
काही माणसांच्या बोलाची कधी
ऐकणार्याला सहज वाटते प्यावी थोडी
आणि असतो त्यांचा बोलाचाच भात
ऐकणार्याचा होतो निप्पात
पण तरीही काही माणसं आपली असतात
काही माणसं जीव लावतात
वेळ प्रसंगी जीव ओततात
अन आपल्यासाठी जीवाचा आटापिटा करतात
अशा माणसांत वावरताना
काही माणसं चुकून कळतात
काही माणसं चुकताना कळतात
काही कलताना चुकतात
पण
अशा माणसा माणसांत वावरताना
माणसं माणसं कळून चुकतात.
Comments