Skip to main content

Posts

Showing posts from September, 2021

चिकाटी

 चिकाटी आम्हाला सवय फक्त लॉक, लॉकअप, लॉकर आणि लिपलॉक एवढ्याची, एवढीच काय ती मजल होती आमच्या इवल्या मेंदूची. लिपलॉक हा लोकलज्जेस्तव कधी उच्चारला सुद्धा नाही. लॉकर वगैरे असायला तशी ऐपत नव्हती  कधी त्याचा संबंध आला नाही. नाही म्हणायला, इन्शुरन्स वाल्यांनी 'लॉकइन' रुजवला आहे खरा.  पण हिंदी सिनेमाने मात्र प्रामाणिकपणे  'लिपलॉक' हा हिन्दी शब्द(?) लहानपणापासून शिकवला आहे. त्यात आता हे 'लॉकडाऊन'! अन सगळंच झालंय अपसाईड डाऊन!! कुणाचं शेअर मार्केट डाऊन, कुणाचं टीआरपी डाऊन, कुणाचं इनकम डाऊन, कुणाचं डाऊन राजकारण, कुणाचं डाऊन आचरण कुठं रेड अलर्ट तर कुठं बॉटमस् रेड! हॉस्पिटल्सनी सज्ज ठेवले असंख्य बेड. सरकार सगळे उपाय करायला कंबर कसून तयार, विरोधकांनी त्याचं ही करावं हत्यार. एकशे तीस कोटींचा देश, त्यातही अव्यवस्था, अज्ञान, अशिक्षितपणा, बेकारी, दहशतवाद, श्रद्धाळू अंधश्रद्धा आणि डोळस अंधश्रद्धा किती किती म्हणून अडचणी? पण भारतीय बाण्याचा एक गुण विशेष : *चिकाटी* कुठल्याही समस्येवर मात करण्याची त्यांची जुगाडू हातोटी! असो, कुणी मेनू बनवले, कुणी खेळ खेळले (इंडोर) कुणी एकमेकांना घरबसल्...