Skip to main content

Posts

Showing posts from July, 2011
असंच 'असंच' काही नसतं नक्कीच काहीतरी असतं 'काही नाही' म्हणण्यात सुद्धा  'काही तरी' नसणे हे असतं  म्हणून म्हणतो  असंच काही नसतं  नक्कीच काहीतरी असतं. मला काही नको  असे म्हणण्यात 'काय काय नको' हे असतं 'काही हि नको' हे तात्पुरतं असतं नंतर पुन्हा काहीतरी हवंच असतं निदान 'काही हि ' नको ह्यातले हे 'म्हणणे' तरी हवे असते. म्हणूनच म्हणतो 'असंच' काही नसतं. मी 'खरंच' सांगतोय म्हणण्यात 'मी खरा आहे' हे असतं 'मीच खरा आहे' हे हि कधी कधी असतं पण खरं काय नि खोटं काय? हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं चांगल्या वाईटाचं ज्ञान प्रत्येकाला असतं म्हणून म्हणतो असाच काही नसतं  नक्कीच काहीतरी असतं......

तो पहिला अनुभव...

तो पहिला अनुभव... तो नजरेचा रोख पहिला, मी अनुभवला.. कधी तीव्र , कधी खोल तो इशारा पहिला  मी अनुभवला... तो संग पहिला, मी अनुभवला... क्षण हळवा, गहिरा  तो रंग पहिला मी अनुभवला... तो संवाद पहिला, मी अनुभवला.. उत्कट, आर्त तो बोलका अबोला पहिला मी अनुभवला... तो स्पर्श पहिला मी अनुभवला.. धुंद हवा , बंध नवा तो शहारा पहिला मी अनुभवला.....

Celebration...

When you turn to me and glance, My life feels heavenly trance... When you smile full-fledge, My life goes smoothly as on sledge... When you utter just few words, My life becomes flight of joyful birds... When you speak a full sentence, My life frees, it gets no tense.... And when you have with me a conversation, My life becomes just a celebration.... for Ruchika.